Thu, Jan 17, 2019 18:37होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्र्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे

मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्र्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे

Published On: Apr 05 2018 3:41PM | Last Updated: Apr 05 2018 3:31PMसोलापूर : प्रतिनिधी

नुकतेच लातूर येथे सहकारमंत्र्यांनी लिंगायत समाजाची भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करण्याची मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद हैबतपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘विद्यापीठाचे नाव बदलून, समाजाला धर्म मागूण आणि जातीला आरक्षण मिळवून कोणाचे पोट भरत नाही’ असे वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूरमध्ये काही दिवसांपूर्वी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘राम मंदिर बांधून कुणाचे पोट भरणार आहे का?’ असा सवाल महाराष्ट्र बसव परिषदेने सहकारमंत्र्यांना केला आहे. तसेच या वक्तव्यावरून त्यांचा लिंगायत व्देष आणि संविधान विरोधी मानसिकता दिसून येत आहे. तसेच सहकारमंत्री देशमुख यांनी लिंगायत समाजाच्या प्रश्‍नाची काळजी करून शहाणपन शिकवण्यापेक्षा आपली नैतीकता जपावी, असे हैबतपुरे म्‍हणाले.

सुभाष देशमुख यांनी लिंगायत अस्मितेशी खेळू नये. तरी त्यांनी आठ कोटी लिंगायत समाजबांधवांची माफी मागावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करावे. अन्यथा याचे परिणामी कर्नाटकमध्ये होणार्‍या निवडणुकीतही दिसून येतील. येत्या आठ दिवसात सर्व लिंगायत समाजबांधव, संस्था एकत्र येवून आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष हैबतपूरे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस मणिष काळजे, अक्षय बकाले-पाटील आणि दत्ता इरपे उपस्थित होते.

Tags : CM, devendra fadanvis, subhash deshmukh, cabinet