Thu, Nov 22, 2018 02:35होमपेज › Solapur › धक्कादायक; सोलापूर विद्यापीठात चेजिंग रूममध्ये CCTV 

सोलापूर विद्यापीठात चेजिंग रूममध्ये CCTV 

Published On: Apr 09 2018 4:33PM | Last Updated: Apr 09 2018 4:33PMसोलापूर : पुढारी ऑनलाईन 

सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने महिलांच्या चेंजिंग रुम आणि बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या कॅमेऱ्यांमुळे मुली आणि महिलांची कुचंबणा होत आहे. कॅमेरे बसवण्याचे आदेश देणाऱ्या भूगर्भशास्त्र विभागाप्रमुख  पी. प्रभाकर यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने कुलसचिव डॉ.गणेश मंझा यांना दिले आहे. 

चेंजिंग रूममध्ये सीसटीव्हीचा निर्णय महिलांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारा तसेच महिलांच्या भावना दुखावणारा आहे. महिलांना अवमानास्पद वाटणारे कृत्य पी. प्रभाकर यांनी केले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

CCTV ऐवजी फलक काढले

चेजिंग रुम आणि बाथरुम परिसरातील सीसीटीव्ही काढण्या ऐवजी रुमबाहेरील फलक काढण्याचे आदेश विभागप्रमुख पी.प्रभाकर यांनी दिले होते. फलक काढल्याने महिला आणि मुलींना चेंजिंग रूम नक्की कुठे आहे हेच कळत नव्हते. पी. प्रभाकर यांनी महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 

चित्रा वाघ यांचा ट्विटरवर संताप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करून या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. ‘सोलापूर विद्यापीठातील संतापजनक प्रकार आहे. भुगर्भशास्त्र विभागात महिला चेजिंग रूम व बाथरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलाय. मुलींमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. असले माथेफीरू आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 

Tags : CCTV, Solapur University, Chitra Wagh, Womens Changing Rooms