Tue, Apr 23, 2019 09:39होमपेज › Solapur › ब्रेनडेड रुग्णामुळे चौघांना मिळाले जीवदान

ब्रेनडेड रुग्णामुळे चौघांना मिळाले जीवदान

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:52AMसोलापूर : प्रतिनिधी

दुचाकी अपघातानंतर उपचारावेळी ब्रेनडेड झालेल्या युनूस सत्तार शेख यांच्या नातेवाईकांनी ऐन बकरी ईद सणाच्या दिवशी अवयवदानाचा निर्णय घेऊन चौघांना जीवदान दिले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी दाखविलेल्या या औदार्यामुळे अवयव प्रत्यारोपण होणार्‍या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना धन्यवाद दिले.

उस्मानाबाद शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक युनूस सत्तार शेख असे ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे नाव आह़े़ 19 ऑगस्ट रोजी सोलापूर- तुळजापूर रोडवर शिरवळ येथे दुचाकी आणि कारच्या धडकेत मेंदू मृत रुग्ण युनूस याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती़ त्याच्यावर तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरात आणण्यात आले होते़.

मंगळवारी रात्री उशिरा त्याची तपासणी केली असता ते मेंदूमृत झाल्याची घोषणा अश्‍विनी रुग्णालयाच्या प्रशासनाने केली होती़  त्यानंतर त्यांच्या नातलगांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला़  त्यानुसार मेंदूमृत रुग्ण युनूस यांची एक किडनी, स्वादुपिंड, डोळे या अवयवाचे दान करण्यात दान करण्यास मान्यता मिळाली. त्यानुसार एक किडनी व स्वादुपिंड पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला रवाना करण्यात आले.
याशिवाय ससून रुग्णालयास लिव्हर, शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दोन डोळे आणि एक किडनी सोलापूरच्याच अश्‍विनी रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपण करण्यात येणार आह़े़  अ‍ॅम्ब्युलन्सला निरोप देताना रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

मेंदूमृत रुग्ण हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील रहिवासी आहे़  त्यांच्या पश्‍चात तीन मुले, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे.