Thu, Apr 18, 2019 16:19होमपेज › Solapur › रक्‍तदान, हेल्मेट वाटप करून वाहिली मित्राला श्रध्दांजली

रक्‍तदान, हेल्मेट वाटप करून वाहिली मित्राला श्रध्दांजली

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:12PMवैराग : प्रतिनिधी

रस्ते अपघातात मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राच्या डोक्याला हेल्मेट असते तर कदाचित त्याचे  प्राण वाचले असते. हा विचार करुन हेल्मेट वापराप्रती जनजागृती करण्याचा निर्णय संजीवनी प्रतिष्ठानने घेतला व गावामध्ये रक्तदान शिबिर घेऊन लकी ड्रॉ पध्दतीने अकरा रक्तदात्यांना हेल्मेट वाटप करून आपल्या मित्राला एका वेगळ्याप्रकारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

धामणगाव येथील  माऊली गुरव यांचे राळेरास येथे 2 मे रोजी अपघाती निधन झाले होते. जिवाभावाचा मित्र सोडून गेल्याचे मोठे दुःख मित्रांना झाले होते. माऊलीच्या डोक्याला जर हेल्मेट असते तर माऊलीचा मृत्यू झाला नसता. गाडी चालवताना हेल्मेट नसल्याची सल मित्रांच्या मनात होती. म्हणून मित्रांनी रक्तदान शिबिर घेऊन हेल्मेट वाटप करून माऊलीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

संत माणकोजी बोधले महाराज मंदिरात पार पडलेल्या या उपक्रमात डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. लकी ड्रॉमध्ये महादेव ताटे, राम ढेकणे, सुधीर कोरके, बाबासाहेब ताटे, राजेंद्र काटकर, श्रीकांत आलाट, सुहास ढेकणे, सुरेश सोनवणे, अमोल कुलकर्णी, रणजित देशमुख, नागनाथ गयाळी हे विजेते ठरले. संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास ढेकणे, सचिव अशोक लोहार, सदस्य कृष्णात देशमुख, धनाजी देशमुख, अशोक सुरवसे, गणेश मसाळ, चांगदेव गवळी, धनाजी गाडे, गजानन बोधले यांच्या उपस्थितीत हेल्मेट बक्षीस करण्यात आले.यावेळी चंद्रकांत काटकर यांना पायाच्या शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला.