Thu, Sep 19, 2019 03:25होमपेज › Solapur › मोदी स्मशानभुमीत साजरा झाला लग्नाचा वाढदिवस(व्हिडिओ)

मोदी स्मशानभुमीत साजरा झाला लग्नाचा वाढदिवस(व्हिडिओ) 

Published On: Dec 21 2017 11:01PM | Last Updated: Dec 21 2017 11:01PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

हल्ली वाढदिवसाचे सेलिब्रेशन म्हटले की हायफाय, थ्री-फोर स्टार हाँटेलमध्ये जंगी पार्टी देवून आपल्या नसलेल्या प्रतिष्ठेचे ओगंळवाणे प्रदर्शन करण्याची नवी प्रथाच रूजू होत आहे. पण सोलापूर शहरातील एखा प्रतिष्ठेत जोडप्याने चक्क स्मशानभूमीत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

शहरातील मोदी स्मशानभुमीत गुरूवारी सायंकाळी हार-तुरे आणि स्टेज उभारण्याची लगबग सुरू होती. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मयतीची तयारी सुरू असल्याचा समज परिसरातील नागरिकांचा होत होता. तेवढ्यात  सोलापूरचे प्रसिध्द शिल्पकार व मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नितिन जाधव व त्यांच्या पत्नी जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा अभिंजली जाधव या लवाजम्यासह स्मशानभूमीत दाखल झाल्या.

मराठा सेवा संघाच्या विचारसरणीला अनुसरून अंधश्रध्दा अनिष्ट रूढी परंपरा यांना छेद देत विज्ञानवादी दृष्टिचा अंगिकार करून समाजात प्रबोधन करण्याचे कार्य प्रतिज्ञा केलेल्या जाधव जोडप्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस स्मशानभुमित साजरा करण्याचा पण सोडला होता. त्यातूनच शेकडो कार्यकत्यांसह याठिकाणी दाखल झालेल्या जाधव व कार्यकत्यांनी सजावलेल्या स्टेजवर जिजाऊ वंदन म्हणत केक कापला. यावेळी उपस्थितांनी उभयतांना शिवमय शुभेच्छा देत या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले. 
सर्वसामान्य नागररिकांच्या मनात स्मशानभुमी बद्दल अनेक समज गैरसमज आहेत तसेच मनात थोडिशी भीती असते ती भीती व गैरसमज दुर व्हावा हाच उद्देश या वाढदिवसाच्या मागचा होता. अशी प्रतिक्रिया पक्षाचे महानगरप्रमुख श्याम कदम यांनी दिली.