Thu, Apr 25, 2019 14:00होमपेज › Solapur › भीमा कोरेगावप्रश्‍नी थेट राष्ट्रपतींना निवेदन देणार 

भीमा कोरेगावप्रश्‍नी थेट राष्ट्रपतींना निवेदन देणार 

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:36PMसोलापूर ः प्रतिनिधी  

1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे रणसंग्रमातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यााठी जमा झालेल्या समाजबांधवांवर भ्याड हल्ला केल्याप्रकरणी चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कारवाई व्हावी यासाठी थेट राष्ट्रपतींनाच निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.

यामध्ये मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले माघारी घ्यावेत, कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली समाजातील तरुणांना सुरू केलेले अटक सत्र तत्काळ बंद करावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या असून, या आंदोलनामध्ये विविध संस्था व संघटना सहभागी झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये भारत मुक्ती मोर्चा, अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मूलनिवासी, महिला संघ, इंडियन लॉयर्स असोसिएशन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, भीमदल संघटना, भीम आर्मी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने सहभाग नोंदविला होता. 

यावेळी युवराज पवार, सीताराम सोनवले, अमोल शिंदे, लक्ष्मी लोखंडे, अ‍ॅड. विक्रम काटुळे, गणेश मंदापुरे, सिध्दार्थ तुपसाखरे, सलाम शेख, फारुक शेख, दीपक शिंदे, अ‍ॅड. अखिल शेख, मतीन बागवान, अ‍ॅड. सैफन शेख, अ‍ॅड. तुकाराम राऊत, भारत परळकर, अशोक गायकवाड, सविता मस्के, सुजाता शेंडगे, जयश्री भालेराव, रेखा सिद्धगणेश, सचिन गायकवाड, विनोद नागटिळक, सागर लोंढे आदी उपस्थित होते.