Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Solapur › भीमा कोरेगावप्रकरणी तुंगत येथे रास्ता रोका

भीमा कोरेगावप्रकरणी तुंगत येथे रास्ता रोका

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 9:39PM

बुकमार्क करा
तुंगत :  वार्ताहर

भीमा कोरेगाव (ता.शिरूर जि.पुणे) येथील घटनेचा निषेध करण्यासाठी तुंगत (ता.पंढरपूर) येथील   समाजबांधवांनी एकत्र येऊन सकाळी पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
तसेच सदर घटनेबद्दल निषेधाच्या घोषणा देत, शासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तहसीलदारांचे वतीने मंडल अधिकारी ए.आर.टेळे, तलाठी एस. एम. नाईक यांनी निवेदन 
स्वीकारले. 

यावेळी व्यापारी बांधवांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविला. भीमनगर येथील संतोष आवचारे, मसा वनसाळे ,वामन वनसाळे, सागर शिंदे, बळी वनसाळे, श्रीकृष्ण प्रक्षाळे, किरण आवचारे, विक्रम प्रक्षाळे, देवानंद सांवत , सचिन वनसाळे, संदीप वनसाळे, किशोर वनसाळे, राहुल फडतरे, अतुल शिंदे, प्रमोद वनसाळे, विष्णू वनसाळे आदी समाजबांधव उपस्थित होते ता.पो.निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.