होमपेज › Solapur › भीमा कोरेगावप्रकरणी मोडनिंब येथे रास्ता रोको

भीमा कोरेगावप्रकरणी मोडनिंब येथे रास्ता रोको

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 9:41PM

बुकमार्क करा
मोडनिंब : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेतील प्रमुख आरोपी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व आनंद दवे यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कलम 302, अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा आणि या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना शासनाने पंचवीस लाख रुपये द्यावेत, या मागणीसाठी गुरुवारी मोडनिंब येथील आंबेडकरनगर येथून राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करून शहरातून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सोलंकरवाडी रस्त्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर सुमारे अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी रिपाइंचे नागनाथ ओहोळ, कुमार वाघमारे, राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी, शिवसेनेचे वैभव मोरे, मनसेचे प्रशांत गिड्डे, बहुजनचे सुनील ओहोळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, गोटू मोरे, माजी समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे  आदी प्रमुख नेत्यांनी आपले मनोगत मांडले. या मोर्चात मातंग आघाडीचे सदाशिव पाटोळे, हमाल तोलार युनियनचे सचिन सोमासे, सुधीर सुर्वे,  सरपंच जयसिंग गिड्डे, बाबुराव सुर्वे, संजय लोखंडे, सुनील ताकतोडे, कैलास गायकवाड, महेश कांबळे, भारत घोलप, महावीर वजाळे, शाहीर कुलकर्णी, दलितशेठ गायकवाड, कुर्डुवाडीचे नगरसेवक अतुल माने आदींनी सहभाग घेतला.