Tue, Jul 23, 2019 02:47होमपेज › Solapur › भीमा-कोरेगाव प्रकरणी महूद, मंगळवेढ्यात कडकडीत बंद

भीमा-कोरेगाव प्रकरणी महूद, मंगळवेढ्यात कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 9:34PM

बुकमार्क करा
महूद : वार्ताहर

महूद (ता. सांगोला) येथे भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महूद, महीम, चीक महूद येथे बंद पाळून त्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला. यावेळी महूद पोस्ट पोलिस सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी आर. पी. आय.चे जिल्हा उपप्रमुख नवा सरतापे, विकास सरतापे, चंद्रकांत सरतापे, भागवत सरतापे, जिल्हा शिवसेना उपप्रमुख सुर्यकांत घाडगे, सरपंच बाळासाहेब डाहळे, जिल्हा संघाचे दुधसंचालक बाळासाहेब पाटील यांनी मंडल अधिकारी मागाडे यांना निवेदन देण्यात आले. 

मंगळवेढा तालुका

भीमा -कोरेगाव येथे झालेल्या घटनेचे पडसाद मंगळवेढ्यात उमटले. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यास शहरातून प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठ बंद केल्या होत्या. तसेच  विद्यार्थी वाहतूक करणार्‍या  शाळा महाविद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील दामाजी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, बोराळे नाका, सांगोला नाका येथील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवत पाठिंबा दिला. 

मेडिकल सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. तर राज्य परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगाराच्या बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनाद्वारे प्रवास करीत आहेत  .पतसंस्था बँकाचे व्यवहार सुरळीत पणे सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले.