Wed, Nov 21, 2018 13:18होमपेज › Solapur › सोलापूर : खंडणी मागितल्याप्रकरणी भैय्या देशमुख अटकेत

सोलापूर : खंडणी प्रकरणी भैय्या देशमुख अटकेत

Published On: Mar 08 2018 9:16AM | Last Updated: Mar 08 2018 9:20AMसोलापूर : प्रतिनिधी

प्रकरण मिटविण्यासाठी 72 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून दुपारी भैय्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

एका प्रकरणात आपण मध्यस्थी करणार असल्याचे सांगत भैय्या देशमुख यांनी आपल्याकडे 72 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका महिलेने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या फिर्यादीच्या आधारे गुन्हा दाखल करत भैय्या देशमुख यास अटक करण्यात आली आहे.