होमपेज › Solapur › चांगभलं च्या जयघोषात भैरवनाथाची यात्रा संपन्न

चांगभलं च्या जयघोषात भैरवनाथाची यात्रा संपन्न

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:35PMमाळशिरस : तालुका प्रतिनिधी

मेडद (ता.माळशिरस) येथील ग्राम दैवत काल भैरव नाथाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात  संपन्न झाली .मेडद येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा माघ पोर्णिमेला साजरी केली जाते. सोनारीच्या काल भैरवनाथाचे स्थान म्हणून व नवसाला पावणारा नाथ म्हणून या भैरवनाथावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. आज सकाळी पहाटे महाआरती झाल्यानंतर श्री ची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भैरवनाथाच चांगभलं, देवाच्या घोड्याच चांगभल या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

या ग्रामदेवतास बोललेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामध्ये राज्याच्या काना कोपर्‍यातून डवरी समाज मोठ्या संख्येने येतो. दरवर्षी 10 रु .च्या नोटापासून 2 हजार रु. नोटाचे हार रथावर भाविक बांधतात. प्रत्येक वर्षी रथावरील नोटांच्या हाराच्या माध्यमातून व रोख देणगी मधून लाखो रुपये देवस्थान ला जमा होतात. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी सुरु झालेला रथोत्सव ग्राम प्रदक्षणा घालून सुमारे अडीच वाजता मंदिरात परत आला. यात्रा काळात कसलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी माळशिरस पोलीस ठाण्याचे पो. नि. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दुपारी कुस्त्यांच्या मैदानानंतर यात्रेची सांगता झाली.