Mon, May 20, 2019 20:09होमपेज › Solapur › अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराचे सुशोभिकरण करा : नगरसेवक सर्वगोड 

अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसराचे सुशोभिकरण करा : नगरसेवक सर्वगोड 

Published On: Apr 27 2018 11:01PM | Last Updated: Apr 27 2018 10:11PMपंढरपूर : प्रतिनिधी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव पुढील महिन्यात  साजरा होणार असून हा उत्सव लक्षात घेऊन पंढरपूर नगरपालिकेने तातडीने गजानन महाराज मठ परिसरातील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी पंढरपूर नगरपालीकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या बाबत अधिक माहीती देताना सर्वगोड म्हणाले की,पुढील महिन्यात 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे.यापूर्वी या पुतळा परिसरात सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घेणे गरजचे झाले आहे.तर जयंती उत्सवानंतर तज्ज्ञ वास्तुरचनाकाराकडून या परिसराच्या सुशोभिकरणाचा समर्पक आराखडा तयार करून त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा या आशयाचे निवेदन नगरपालीकेस दिले आहे. अहिल्यादेवींच्या पंढरपूरसाठी केलेल्या कार्याची महती लक्षात घेवून त्यांचा पुतळा परिसराचे आकर्षक सुशोभिकरण करण्यात यावे व येथे संगमरवरी फलकावर अहिल्यादेवींनी पंढरपुरात केलेल्या कामांची महती वर्णन केली जावी अशी अपेक्षाही यावेळी डी.राज सर्वगोड यांनी व्यक्‍त केली. तर या निवेदनाची एक पत्र नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांंनाही देण्यात आली आहे.   हे निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, संतोष बंडगर, सोपानकाका देशमुख, प्रशांत घोडके, अमित अवघडे, मनोज आदलींगे, संजय मदने, अमित लाडे, आण्णा सलगर, विशाल आर्वे, गोविंद मेटकरी, सोमनाथ ढोणे, संदीप मुटकुळे, महादेव धोत्रे, ओंकार जगताप, आनंद चव्हाण, लखन गांडुळे, सोहन जयस्वाल आदी उपस्थित होते.