Sat, Jul 20, 2019 11:09होमपेज › Solapur › बार्शीत अपहृत मुलाचा खून

बार्शीत अपहृत मुलाचा खून

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:48PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी येथून अपहरण करण्यात आलेल्या  एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अज्ञातांनी खून  करून त्याचा मृतदेह डॉ. मस्तुद हॉस्पिटलच्या पाठीमागील एका ओढ्यात टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश सुनील पवार (वय 16, रा. धनशेट्टी रोड, बार्शी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

 सुनील माणिक पवार (वय 47) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गणेश पवार हा राहत्या घरातून बाहेर फिरून येतो असे सांगून बाहेर गेला होता. तो घरी परत न आल्यामुळे 15 ऑगस्ट  रोजी  अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यानंतर मस्तुद हॉस्पिटलच्या पाठीमागील ओढ्यात अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे बार्शी येथे दफन करण्यात आले होते. मात्र, बेवारस मृताचे वर्णन व कपडे पाहून बेवारस मृत हा गणेश सुनील पवार (वय 16) हा असल्याचे समोर आले.

पो. नि. सर्जेराव पाटील, तहसीलदार व  इतर यंत्रणेसह सर्वजण शवदफन केलेल्या ठिकाणी गेले असता यातील मयत इसमाचे  कपडे व त्याचे वर्णन यावरून संबंधित मयताचे वडील व नातेवाईक यांनी ओळख पटविलेली आहे. 
पोलिसांनी प्रेताचे कपडे व गळ्यातील माळ दाखवली असता नातेवाईकांनी ते ओळखले. त्यामुळे सोमवारी पुरलेले प्रेत बाहेर काढून फिर्यादीसह नातेवाईकांना दाखवले असता हे प्रेत आपल्याच मुलाचे  असून त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर ॠ असे गोंदलेले होते, तसेच त्याच्या गळ्याच्या डाव्या बाजूस ऑपरेशन केलेली खूण होती. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचा खून केल्याचे निष्पन्न म्हणून अज्ञात इसमाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करत आहेत.