Fri, Nov 16, 2018 15:04होमपेज › Solapur › परवाना नुतनीकरणासाठी लाच घेताना सहायक निबंधकास अटक

परवाना नुतनीकरणासाठी लाच घेताना सहायक निबंधकास अटक

Published On: Apr 05 2018 8:21PM | Last Updated: Apr 05 2018 8:21PMबार्शी : तालुका प्रतिनिधी

खासगी सावकारीच्या परवाना नुतनीकरणासाठी 15 हजार रूपयांची लाच घेताना बार्शीतील सहाय्यक निबंधक व एका खासगी इसमास रंगेहात अटक करण्यात आली. सहकारी संस्था कार्यालयाचे श्रेणी 2 चे सहाय्यक निबंधक गोविंद किसनराव कळसकर (वय 48 वर्षे) यांच्यासह  बाबासाहेब दिगंबर जाधव (वय 42, रा. उपळाई रोड, बार्शी) या खासगी इसमास लाच घेताना अटक करण्यात आली.

याविषयी अधिक माहिती अशी, तक्रारदार हे खाजगी सावकारी व्यवसाय करतात. त्यांचा सावकारी परवाना 2018-19 साठी नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी कार्यालयात सादर केला होता. प्रस्तावाची तपासणी करून मंजूरीसाठी जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठविण्यासाठी सहाय्यक निबंधक गोविंद किसनराव कळसकर यांच्यासह बाबासाहेब दिगंबर जाधव यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराकडून लाच  स्विकारताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई झाल्याने लाचखोर अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.