Thu, Jun 04, 2020 03:34होमपेज › Solapur › बार्शी तालुक्यात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

बार्शी तालुक्यात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:45PM

बुकमार्क करा

बार्शी : तालुका प्रतिनिधी

बार्शी शहर व तालुक्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.बार्शी न्यायालय परिसरबार्शी यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नगरसेवक विजय राऊत, पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, रणविर राऊत, संदेश काकडे, रमेश पाटील, दीपक ढावारे, मुकुंद यादव, रणजित चांदणे, गौतम वाघमारे, विजय लंकेश्‍वर, गणेश शिंदे, सूरज नागटिळक, मिलिंद ताकपिरे, अविनाश गायकवाड आदींच्या उपस्थितीत अभिवादन झाले.

आंबेडकराईट स्टुडंट्स फ्रंट बार्शी

आंबेडकराईट स्टुडंट्स फ्रंटतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी रणजित कांबळे,  अध्यक्ष प्रसन्नजीत नाईकनवरे, रवी बोकेफोडे, कपिल 
बोकेफोडे, श्रीकांत कांबळे, अविनाश बोकेफोडे, धनंजय कांबळे, राजरत्न बोकेफोडे, मनोज सोनवणे, प्रवीण बनसोडे, पप्पू बनसोडे, नितेश बोकेफोडे, अजित कांबळे, तुषार बोकेफोडे, संतोष बोकेफोडे, श्याम सोनवणे, गणेश शिंदे, बाबासाहेब गायकवाड, विजय वाघमारे, रूपेश बंगाळे, दीपक बोकेफोडे आदी उपस्थित होते. 

शिवाजी महाविद्यालय 

शिवाजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, डॉ. भारती रेवडकर, डॉ.दिलीप कराड,  प्रा. दत्तात्रय मांजरे,  केशव धेंडे, डॉ. रविकांत शिंदे, डॉ.पंडित लावंड आदी उपस्थित होते.

मांडेगाव ग्रामपंचायत

मांडेगाव ग्रामपंचायतीत सरपंच पंडित मिरगणे, उपसरपंच देवदत्त मिरगणे, ग्रामसेवक संतोष आवारे, जगजीवन दळवी, उत्रेश्‍वर सोनवणे, बालाजी दळवी यांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले. 

महामानव संस्था, गुळपोळी

महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून नितीन पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, रणजित चौधरी, आण्णासाहेब भालशंकर, अशोक गायकवाड, सुनील चौधरी, सागर चौधरी, आकाश चौधरी, किरण खुरंगळे, रंजना खुरंगळे, आशा भालशंकर, सुभद्रा चौधरी, कौशल्य खुरंगळे आदी उपस्थित होते.