Sun, Jun 16, 2019 12:31
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › क्रेनचा धक्का लागून मृत्यू, क्रेनचालकाविरूद्ध गुन्हा

क्रेनचा धक्का लागून मृत्यू, क्रेनचालकाविरूद्ध गुन्हा

Published On: Jun 02 2018 10:31PM | Last Updated: Jun 02 2018 9:02PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

शेतातील विहिरीत आडवे बोअर घेण्यासाठी लावलेल्या बोअरचा धक्का लागून  एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी क्रेनचालकाविरूद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
थंगवेलू कालियानन्नन (बी कुट्टी स्ट्रीट, कोसायम, पालायम, पेरूनकुट्टी, रा. परमाथी वेल्लुर, ता. जि. तामिळनाडू)  असे शेतकर्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार,  27  मे रोजी गुळपोळी, ता. बार्शी शिवारात संजय बाबासाहेब चिकने (वय 40, रा. गुळपोळी) या शेतकर्‍याचा क्रेनच्या धक्क्याने विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. 

  दीपक जनार्धन चिकने (वय 55, रा. गुळपोळी) यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली होती. त्यानुसार घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली होती.  त्यानंतर शनिवारी क्रेनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, मृत संजय चिकने यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत आडवा बोअर मारण्याची बोअर घेण्यासाठी बोअर वेल्सची मोटर मागवली होती. तेव्हा बोअर वेल्सच्या सोबत असणार्‍या क्रेनचा धक्का लागून विहिरीत पडून डोक्याला मार लागून ते मृत झाले होते.   अधिक तपास हवालदार सचिन माने हे करत आहेत.