Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Solapur › बार्शी बाजार समितीसाठी होणार तिरंगी लढत 

बार्शी बाजार समितीसाठी होणार तिरंगी लढत 

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 10:50PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 122 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. बार्शी बाजार समितीसाठी आता तिरंगी लढत होणार हे निश्‍चित झाले आहे.

 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 183 जणांनी 208 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांपैकी 13 उमेदवारांचे अर्ज अवैध झाले होते. 182 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. यापूर्वी 40 उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आले होते. उमेदवारीचा निर्णय झाल्यामुळे आता खर्‍या अर्थाने निवडणुकीत रंगत येणार असून लढत तिरंगी होणार आहे. 

 आ. दिलीप सोपल यांच्या  ‘शेतकर्‍यांची बाजार समिती वाचवा आघाडी’चे उमेदवार असे :

आगळगाव - डमरे अभिमन्यू अर्जुन, पांगरी - काळे मंदाकिनी शिवाजीराव, उक्कडगाव- सोपल योगेश सुधीर, जामगाव (आ)-जाधव गणेश वैजीनाथ, उपळाई (ठों)- येळे अरुण मच्छिंद्र, मळेगाव-कोंढारे आण्णासाहेब ज्ञानदेव, कारी- गायकवाड राजेंद्रकुमार वसंतराव, उपळे- (दुमाला) जाधव अनिल विठ्ठल, घाणेगाव- मोरे नितीन नागनाथ, पानगाव-काळे प्रभावती अशोक, श्रीपतपिंपरी- घाडगे गोवर्धन भाऊराव, सुर्डी- मचाले श्रीकांत हरिषचंद्र, सासुरे-भोसले भागवत संतराम, शेळगांव (आर)-कोरके कपिल बाळासाहेब, भालगांव-काकडे सूरज संपत, हमाल/तोलार-मांजरे चंद्रकांत सदाशिव, आडत्या व्यापारी- गावसाने शिरीष महाबळेश्वर, कानगुडे रविकिरण साहेबराव हे उमेदवार असतील. 

माजी आ. राजेंद्र राऊत यांच्या  ‘बळीराजा विकास आघाडी’चे उमेदवार : आगळगाव- गणेश प्रकाश डमरे, पांगरी- शालन विजय गोडसे, उक्कडगाव- रावसाहेब बाबासाहेब मनगिरे, जामगाव (आ) - रणवीर राजेंद्र राऊत, उपळाई (ठों)- शिवाजी बाबासाहेब हाके, मळेगाव- भगवंत जवाहरमल पाटील, कारी- दयानंद दत्तात्रय डोके, उपळे दुमाला- सचिन बापूसाहेब बुरगुटे, घाणेगाव- झुंबर विनायक जाधव, पानगाव- कुसूम दत्तात्रय काळे, श्रीपतपिंपरी- महादेव श्रीरंग चोरघडे, सुर्डी- काशिनाथ भगवान शेळके, सासुरे- सचिन आबा जगझाप, शेळगाव (आर)- वासुदेव तात्याराम गायकवाड, भालगाव-बुबासाहेब श्रीमंत घोडके, व्यापारी/ आडते- भरतेश नवीनचंद्र गांधी, व्यापारी/आडते- प्रवीण मारुती गायकवाड, हमाल/ तोलार / गजेंद्र मारुती मुकटे.

 राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, जीवनदत्त आरगडे यांच्या  ‘बार्शी तालुका शेतकरी विकास आघाडी’चे उमेदवार : आगळगाव- अविनाश भरत शिंदे, पांगरी- रेखा तानाजी जगदाळे, उक्कडगाव- संतोष तानाजी शिंदे, जामगाव- विनोद संजय वाणी, उपळाई (ठोंगे)- बाळकृष्ण शिवाजी पाटील, मळेगाव- संदीप सुभाष उकिरडे, कारी- अमोल वसंत जाधव, उपळे दुमाला- रामचंद्र भगवान बळप, घाणेगाव- लक्ष्मण सुखदेव मोरे, पानगाव- मंदाकिनी दत्तात्रय ढगे, श्रीपतपिंपरी- प्रकाश शिवाजीराव गुंड, सुर्डी- फुलाजी लक्ष्मण डोईफोडे, सासुरे- जयद्रथ श्रीरंग शेरखाने, शेळगाव (आर) - राजेंद्र सुखदेव मिरगणे, भालगाव- सत्यवान तुकाराम भोसले. व्यापारी मतदार संघ :- साहेबराव शहाजीराव देशमुख, कुणाल दिलीप घोलप, हमाल-तोलार- शाम रामचंद्र शिंदे. तसेच शेतकरी संघटनेचे शंकर पांडुरंग गायकवाड यांनीही 4 गटात अपक्ष म्हणून  उमेदवारी  अर्ज दाखल केले आहेत. आप्पासाहेब विश्वनाथ बुरगुटे व नागनाथ दगडू भड यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शेतकर्‍यांची बाजार समिती वाचवा आघाडीने शिट्टी, बळीराजा विकास आघाडीने ढाल-तलवार व बार्शी तालुका शेतकरी विकास आघाडीने कपबशी चिन्हाची मागणी केली आहे.