होमपेज › Solapur › २० डिसेंबरला वसतिगृह संस्थाचालकांचा मोर्चा

२० डिसेंबरला वसतिगृह संस्थाचालकांचा मोर्चा

Published On: Dec 18 2017 2:44AM | Last Updated: Dec 17 2017 11:38PM

बुकमार्क करा

सोलापूर ः प्रतिनिधी    

राज्यातील जवळपास 739 मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांचे भोजन अनुदान थकवल्या कारणाने बुधवारी (दि. 20) नागपूर येथील विधिमंडळावर संस्थाचालक व कर्मचार्‍यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह संस्थाचालक महासंघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील यांनी दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यातील 739 वसतिगृहांची मूळ मान्यता आदेश नसल्याचे कारण दाखवत भोजन अनुदान आणि कर्मचार्‍यांचा पगार थकविला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 120 वसतिगृहाचा समावेश आहे. बाबासाहेब भुईटे, अशोकलाल शहा, अनंतकुमार  जुमडे, सतीश गोटमुकले, राजशेखर बिराजदार, अमोल हुगे, शाम मोरे, सुग्रीव लवटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.