Tue, Sep 25, 2018 00:50होमपेज › Solapur › दीड वर्षाच्या बाळाचा कुत्र्याने कुरतडला कान

दीड वर्षाच्या बाळाचा कुत्र्याने कुरतडला कान

Published On: Aug 31 2018 2:02PM | Last Updated: Aug 31 2018 2:02PMसोलापूर: पुढारी ऑनलाईन

सोलापूर मध्ये ह्रदय हेलवणारी घटना घडली. दीड वर्षाचा मुलगा घराबाहेर खेळत असताना एका कुत्र्याने त्याचा चावा घेत त्याला जखमी केले. ही घटना बार्शी (जि. सोलापूर) येथील माणकेश्वर गावात घडली.

ताहेर बादेला असे जखमी मुलाचे नाव असुन तो घराबाहेर खेळत असताना अचानक कूत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने केवळ ताहेरचा कानच नाही तर त्याला त्याच्या गालापर्यंत जखमी केले. 

हे दीड वर्षांचे बाळ सोलापूरच्या शासकीय रूग्णालायात उपचारासाठी दाखल केले आहे. कुत्र्याने सालपटून काढलेल बाळाच कान त्याच्या वडीलांनी एका कॅरीबॅग मधून थेट हॉस्पिटल मध्ये आणला आहे. या गंभीर जखमेमुळे डॉक्टरांनी तो बरा होईल पण कान पुन्हा बसविणे अशक्य आहे असे सांगितले आहे.