Thu, Nov 15, 2018 18:23होमपेज › Solapur › कुर्डुवाडीत भाजपच्या वतीने पैगंबर जयंती

कुर्डुवाडीत भाजपच्या वतीने पैगंबर जयंती

Published On: Dec 02 2017 10:30PM | Last Updated: Dec 02 2017 9:51PM

बुकमार्क करा

कुर्डुवाडी : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी माढा तालुका अल्पसंख्याक सेल भाजप युवा मोर्चा व तिरंगा ग्रुपतर्फे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मिठाई व सरबत यांचे वाटप करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी प्रांतिक सदस्य गोविंद आबा कुलकर्णी, कुर्डुवाडी शहराध्यक्ष संजय दादा टोणपे, कुर्डुवाडी पोलिस स्टेशनचे मुदगल, अल्पसंख्याक सेलचे माढा तालुकाध्यक्ष वल्लीमहंमद मुलाणी, कार्याध्यक्ष उमेश पाटील, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुधीर भाऊ गाडेकर, कार्याध्यक्ष आर्शाद मुलाणी, तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील, डॉ. कैलास गोरे, युवानेते लक्ष्मण पवार, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सागर बंदपट्टे, शहर सरचिटणीस अतुल राऊत, सचिव संतोष पवार, नगराध्यक्ष जगन्नाथ बापू क्षीरसागर, हाफीज जहाँगीर रजा,  वाजीद कुरेशी,  तसेच शहर भाजप पदाधिकारी, व्यापारी तसेच मुस्लिम समाजातील युवक बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील रॅलीचे स्वागत करुन मिठाई व सरबत वाटप करून मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.  आभार शहर कार्याध्यक्ष आर्शाद भाई मुलाणी यांनी मानले.