Tue, Apr 23, 2019 09:58होमपेज › Solapur › भाजपचे जि. प. सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण

भाजपचे जि. प. सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण

Published On: Jan 09 2018 4:31PM | Last Updated: Jan 09 2018 4:31PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या एक वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, फरार असूनही गोपाळपूर जि. प. गटातून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे जिल्‍हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव न्यायालयात शरण आले. जिल्हा सत्र न्यायाधीशांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. 

डिसेंम्बर २०१६ मध्ये शहरातील एका व्यापाऱ्यास मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात गोपाळ अंकुशराव आरोपी आहेत. मात्र गुन्हा घडल्‍यापासून अंकुशराव फरार आहेत. पोलिसांनी शोध घेऊनही ते सापडत नव्हते, त्याच दरम्यान अंकुशराव यांनी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. जिल्हा सत्र ते सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळाला नाही. अखेर अंकुशराव यांनी न्यायालयात शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी ते शरण आले. त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.