Sat, Jul 20, 2019 21:39होमपेज › Solapur › भाजप खासदारांचे उपोषण

भाजप खासदारांचे उपोषण

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:50PMसोलापूर : प्रतिनिधी 

संसदेमध्ये राजकीय स्वार्थासाठी संसदेचे कामकाज वारंवार बंद पाडून काँग्रेसच्या खासदारांनी लोकशाहीचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे खा. अ‍ॅड. शरद बनसोेडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले.

संसदेचे कामकाज सुरू असताना काँग्रेस सदस्य वारंवार गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रकार करत आहेत. त्यामुळे हा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे लोकशाहीची गळपेची होत असल्याने अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी काँग्रेस खासदारांचा निषेध व्यक्‍त केला, तसेच सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी कार्यरत असणार्‍या लोकशाही तसेच संसदेचे पावित्र्य राखणे सर्वांची जबाबदारी असल्याने त्याठिकाणी शांतता राखावी, असे आवाहन अ‍ॅड. शरद बनसोेडे यांनी केले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेवक शिवानंद पाटील, 
नागेश वल्याळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, नगरसेवक नागेश भोगडे, डॉ. किरण देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले होते.