Sun, Mar 29, 2020 07:28होमपेज › Solapur › गुढीपाडव्यानिमित्तत आकर्षक फुलांची आरास

गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

Last Updated: Mar 25 2020 9:13PM

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरपंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्र शुद्ध गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त मंदिरात मनमोहक सोनचाफ्याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. ही आरास स्वतः मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्वखर्चाने केली आहे.

कोरोना व्हायरस सर्व जगभर धुमाकूळ घालत असल्याने शासनाने सर्व राज्यातील मंदिरे 17 मार्च रोजी बंद करण्यात आली. परंतु, मोठमोठ्या मंदिरांतील देवदेवतांची नित्यपूजा ही मंदिरातील पुजार्‍यांनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनीदेखील कोरोना व्हायरसमुळे पाठ फिरवली आहे. मात्र, मंदिर समितीच्या वतीने नित्य पूजाअर्चा सुरू ठेवून गुढीपाडव्यानिमित्त मंदिराच्या गाभार्‍यात  फुलांची आकर्षक सजावट केली आहे. यात सोनचाफा, मोगरा, गुलाब, तुळशीच्या पानाफुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये 55 हजार रुपये किमतीची 150 किलो फुलांचा वापर करण्यात आला असून  सोनचाफा फुलांनी सजावट केलेल्या श्री विठ्ठल मनमोहक रुप सर्वांनी पाहून श्री चे दर्शन आज ऑनलाईन घेत असून मंदिर समितीने केलेल्या सजावटीचे भाविकांतून घरबसल्या कौतुक केले जात आहे.

82 फुटांच्या स्तंभावर ध्वज

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरावर उभारण्यात आलेला स्तंभ जुना झाल्याने तो बदलण्यात आला असून या स्तंभावरील भगवा पताका गुढीपाडव्याला बदलण्यात येते. त्यानुसार नव्याने उभारण्यात आलेल्या 82 फुटांच्या लोखंडी स्तंभावर ध्वज उभारण्यात आला आहे.