बार्शी : तालुका प्रतिनिधी
घरात कोणी नसल्याची संधी साधून घरात घुसून धमकावत तोंडावर ओढणीचा बोळा घालून अल्पवयीन बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना पिंपळगाव -धस ( ता. बार्शी) येथे घडली. सुदाम बाबासाहेब मस्तुद (वय 20, रा. पिंपळगाव-धस) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पीडितेच्या पित्याने याबाबत पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी मजुरीसाठी गेली होती. फिर्यादी हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास शेळ्या घेऊन घरी आले असता मुलीस घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, मुलीने काही कलावधीनंतर दरवाजा उघडला असता सुदाम मस्तुद हा घरातील कॉटखाली आढळून आला. फिर्यादीने तू येथे काय करतोयस, असे विचारले असता तो फिर्यादीस धक्का मारून पळून गेला.
फिर्यादीने मुलीस याबाबत विचारले असता ती घरात टीव्ही पाहात असताना मस्तुद याने घरात येऊन घराचा दरवाजा बंद करून तिच्या तोंडात ओढणीचा बोळा घालून अत्याचार
केल्याचे सांगितले.
Tags : Solapur, Solapur News, Atrocity, against, minor girl
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM
May 05 2018 11:23PM