Fri, Sep 21, 2018 07:52होमपेज › Solapur › अश्विनी तड़वळकर यांची सिनेट पदी निवड

अश्विनी तड़वळकर यांची सिनेट पदी निवड

Published On: Jun 20 2018 9:56AM | Last Updated: Jun 20 2018 9:56AMप्रतिनिधी : सोलापूर

नाट्यकलावंत अश्विनी तड़वळकर यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य म्हणून राज्यपाल कोट्यातून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी निवड केली आहे. सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी याबाबत माहिती दिली. सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्य पदी राज्यपाल विविध क्षेत्रातील दहा प्रतिनिधींची निवड करतात यातील नऊ सदस्यांची यापूर्वीच निवड करण्यात आली होती. मात्र स्थानिक कलावंत अश्विनी तडवळकर यांची मंगळवारी निवड केली असल्याचे जाहीर करण्यात आले. 

वयाच्या पाचव्या वर्षापासून रंगभूमीवर काम करणाऱ्या आश्विनी तडवळकर यांनी अनेक वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर काम करून  व्यावसायिक रंगभूमीवरही शंभूराजे या व्यावसायिक नाटकांतून सोयरा महाराणीची भूमिका साकारली होती. बडे अच्छे लगते हो  व पवित्र रिश्ता  या हिंदी आणि  ‘एकाच या जन्मी जणू’, कालाय तस्मै नमः  लागली वाट, हसत खेळत, फूलोरा यासारख्या मराठी मालिकांतून त्यांनी काम केले आहे. मुक्ती येड्यांची जत्रा, यंदा कर्तव्य आहे, तुझा नवरा माझी बायको,  राजवाडा मकरंद माने दिग्दर्शित कागर, आणीबाणी या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी काम केले आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरीतही त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे अभिनयाचे रौप्यपदक प्राप्त केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.