Thu, May 28, 2020 10:31होमपेज › Solapur › आषाढीला ११०० सफाई कर्मचारी

आषाढीला ११०० सफाई कर्मचारी

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:34PMपंढरपूर : अरूण बाबर

आषाढी यात्रेसाठी आध्यात्मिक पंढरी भाविकांच्या गर्दीने  फुलू लागली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातू श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाची आस घेऊन भाविक पंढरीनगरीत दाखल होत आहे. पंढरीच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने आषाढीसाठी 1100 हंगामी सफाई कर्मचार्‍यांना नियुक्‍त केले आहे. 

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने भाविक शेतीची कामे उरकून  पंढरीच्या वारीला 12 ते 15 लाख भाविक येतील असा अंदाज  व्यक्‍त होत आहे. त्याअनुषंगाने  नगरपालिकेने स्वच्छतेसाठी कायमचे साडेतीनशे आणि यात्रेसाठी साडे आठशे सफाई कर्मचार्‍यांना नियुक्‍त केले आहे.  एकूण आकराशे सफाई कर्मचार्‍यांकडून दररोज 127 वाहनांद्वारे  150 टन कचरा उचलण्यात येणार आहे.  त्याचबरोबर शहरातील पाणीपुरवठा दोनवेळा करण्यात येणार आहे. आणि मंदिर परिसर, स्टेशन रोड, अर्बनबँक, नाथचौक, तांबडा मारुती, कालिकादेवी चौक, शिवाजी चौक, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंटातील  सर्व अतिक्रमण काढण्यासाठी विशेष पथक नियुक्‍त करण्यात आले आहे. 

पत्राशेड दर्शन रांगेसाठीही विशेष स्वच्छतेसाठी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.  65 एकरामध्ये 290 व वाखरी पालखी तळावर 148 मेटल हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. तसेच शहरातील पाण्याच्या टाकीवरून स्वतंत्र पाईप लाईनव्दारे भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी वाळवंटात 54 ठिकठिकाणी नळ कनेक्शन  बसवण्यात आले आहेत. पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.