Sat, Nov 17, 2018 12:06होमपेज › Solapur › मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:09PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी 

सतत आधारहीन व धार्मिक वचनांची मोडतोड करून मनुचे समर्थन करणार्‍या मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे जेऊर येथे  निवेदनाद्वारे करण्यात आली.मनु हा जगद‍्गुरू तुकोबाराय, संत ज्ञानेश्‍वर माऊली व संविधानापेक्षा मोठा आहे, असा अर्थ निघणारे वक्तव्य केले होते. भिडे सतत निषेधात्मक वक्‍तव्य  करत आहेत. म्हणून या विषयाची गंभीर दखल घेऊन भिडे यांच्यावर महापुरुषांच्या बदनामीप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून खटला भरावा अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे.

या मागणीचे निवेदन जेऊर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे यांच्याकडे दिले. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके,  जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, तालुका अध्यक्ष अमित घोगरे, भाऊसाहेब साबळे, शिवम कोठावळे, तसेच संभाजी ब्रिगेडचे राकेश पाटील, तात्यासाहेब सपकाळ, अतुल साबळे, पवन लोंढे, परसुराम शिरसकर, नागनाथ पोळ, गणेश पोळ, सागर पोळ, रणजित घोगरे, सुहास पोळ, अभिषेक साबळे, उमेश घोगरे, नानासाहेब नाईकनवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.