Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Solapur › सोलापूर : प्राथमिक शिक्षणचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  

सोलापूर : प्राथमिक शिक्षणचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  

Published On: Jan 18 2018 7:40PM | Last Updated: Jan 18 2018 7:40PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा शिक्षण सभापती शिवानंद पाटील आणि शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी गुरुवारी केली. शुक्रवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्ह्यातील सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

यंदाचे पुरस्कार हे शरणप्पा फुलारी (कन्नड शाळा बबलाद ता. अक्कलकोट), कांचन भांगे (पानगाव, ता. बार्शी), बाळासाहेब बोडखे (कोंढारचिचोली, करमाळा), संतोष लोकरे (अंजनगाव, ता. माढा), उषा कोष्टी (खोमनाळ, ता. मंगळवेढा), शरद रुपनवर ( गुरसाळे, ता. माळशिरस), नागनाथ येवले (वटवटे, ता. मोहोळ), विजयकुमार जाधव (देशमुख वस्ती पंढरपूर), पुंडलिक कलखांबकर (नंदूर, ता. उत्तर सोलापूर), राजेश्‍वरी कोरे (कपटे वस्ती सांगोला), किरण बाबर (चिंचपूर, ता. दक्षिण सोलापूर) यांना, तर शिष्यवृत्ती प्रकारातून महेश मेत्री (कन्नड शाळा जेऊर, ता. अक्कलकेाट), मनिषा अभिवंत (कोरफळे, ता. बार्शी), संदीप ढेकणे (रावगाव, ता. करमाळा), मेघा बारसकर (चिंचोली, ता. माढा), धर्मराज जाधव (शिवाजीनगर मंगळवेढा), आत्माराम गायकवाड (तुपे वस्ती माळशिरस), भास्कर थोरात (पापरी, ता. मोहोळ), प्रशांत राजपूत (गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर), अलका कोल्हे (दिघेवाडी, ता. सांगोला), विजयकुमार सलगर (वळसंग, ता. दक्षिण सोलापूर), तर उत्तेजनार्थ आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवगंगा शिंदे (फडवस्ती, माढा), नामदेव ढेरे (देवकते-पाटील वस्ती, धानोरे, ता. माळशिरस), असलम इनामदार (मंगेवाडी, ता. सांगोला), सुरेश मलाबादे (औराद, ता. द. सोलापूर),  सुरेखा चौरे (कंदर, ता. करमाळा), गाजरे रघुनाथ (धायगुडे वस्ती, पंढरपूर), शिवाजी लेंडवे (मंगळवेढा), देवबा कांबळे (चिकलगी, ता. मंगळवेढा), विजया  सारोळे (मोहोळ), अपंग प्रवर्गातून देवीदास चौधरी (तळसंगी, ता. मंगळवेढा), कन्नड शाळेतून शिवबाळ गोली (टाकळी, ता. द. सोलापूर), उर्दू माध्यमातून जुल्फीकार मुजावर (औराद, ता. द. सोलापूर) यांना, तर विस्तार अधिकारी म्हणून हरिष राऊत यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

शाल,  श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोख पाचशे रुपये देऊन या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण समितीचे सभापती पाटील आणि शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी केले आहे.