होमपेज › Solapur › करंबक पोलिसांची अवैध दारु धंद्यांवर कारवाई

करंबक पोलिसांची अवैध दारु धंद्यांवर कारवाई

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:20PMकरंबक : 

पोलिस स्टेशनने अवैद्य दारू धंद्यावर  कारवाई करून 80,000 रुपयांची हातभट्टी दारु बनवण्याचे गुळमिश्रीत 2000 लीटर रसायन नष्ट करीत तीन आरोपीं ताब्यात घेतले आहे. सहा.पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  करकंब पोलिस ठाण्याचे प्रभारी   सपोनि रियाज मुलाणी तसेच  पोलिस निरीक्षक दादासाहेब सुळ, पो.ना. गणेश शिंदे, पो.कॉ. आनंद वाघमोडे, पो.कॉ. सोमनाथ खांडेकर,पो.कॉ. संतोष गायकवाड   हे करकंब परिसरात पेट्रोलिंग करीत असताना बोचरेवस्ती, करकंब येथे हातभट्टी दारु काढत असल्याची माहीती मिळाली.

मंगळवारी सकाळी 9 वा चे सुमारास आरोपी महारुद्र बबन काळे (वय 40), भीमा शरद काळे (35),  रतिलाल अंबादास काळे  (48 सर्व रा.बोचरेवस्ती, करकंब ता.पंढरपूर) यांना ताब्यात घेऊन 2000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन अंदाजे किंमत 80,000 रुपयांचे जागीच नष्ट केले आहे. वरील आरोपी विरुद्ध पोना  गणेश धर्मा शिंदे  करकंब पोलिस ठाणे यांनी मुंबई प्रोव्ही.अँक्ट 65 (फ) प्रमाणे फिर्याद दिली असून पुढील तपास पोहेकॉ अमित माळुंजे  हे करित आहेत.