Wed, Apr 24, 2019 16:28होमपेज › Solapur › अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला प्रारंभ

अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला प्रारंभ

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:09PM

बुकमार्क करा
अकलूज : तालुका प्रतिनिधी

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित केलेल्या 26 व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जोपासणार्‍या अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन स्मृती भवन शंकरनगर येथे सिक्कीम  राज्याचे  राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे हस्ते व खा. विजयसिंह मोहिते-पाटील, समितीचे संस्थापक व स्पर्धेचे आयोजक जयसिंह मोहिते-पाटील, या वर्षीचे सहकार महर्षि लावणी कलावंत पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ लोककलावंत रघूवीर खेडकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अविनाश धावने, श्रीमती   सरलाताई नांदुरेकर, श्रीमती कमलताई जाधव व पांडुरंग घोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

सहकार महर्षिंच्या जन्मशताब्दी  निमित्ताने होणार्‍या स्पर्धेत विशेष जादा सादरीकरणाचा मान चार संगीत पार्ट्यांना मिळाला. यातील सादरीकरणाचा प्रारंभ  या स्पर्धेतील सलग तीन वर्ष प्रथम क्रंमांकाची हट्ट्रिक पटकवलेल्या व 2003 च्या  सहकार महर्षि लावणी कलावंत पुरस्कर्त्या राजश्री नगरकर, कालीका कलाकेंद्र सुपा, जि. नगर या पार्टीला मिळाला.त्या पार्टीने मुजरा, गवळण  व पारंपारिक लावण्या सादर केल्या.राजश्रीने आपल्या अभिनयाने सादर केलेल्या पंचबाई अलबेला व स्नेह तुझसी केला,  या बैठकीच्या लावणीतून उपस्थितांची दाद मिळवली. तर गर्दीत मारला धक्का,   या लावणीने रसिकांना भूरळ घातली.

जेजुरीच्या खंडेराया या लावणीतून सहकार महर्षिंना अनोखे अभिवादन केले. गायिका किर्ती बने, पेटी सुधीर जावळकर, ढोलकी सुनील कुडाळकर, पांडुरंग घोटकर यांनी सुरेख साथ दिली.
दोन दिवस चालणार्‍याया  स्पर्धेत पहिल्या दिवशी व्यावसायिक तर दि. 7 रोजी पारंपारिक पार्ट्यांचे सादरीकरण होत आहे. 
स्पर्धेला आ. दिलीप सोपल, आ. हणमंतराव डोळस, मुख्य. कार्य. अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचीही उपस्थिती होती.