Tue, Mar 26, 2019 08:25होमपेज › Solapur › अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात समावेश

अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात समावेश

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 11:05PM

बुकमार्क करा
अकलूज : वार्ताहर

येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर पुरेसा औषधांचाही पुरवठा नसताना भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या या पायलट प्रोजेक्टमध्ये या रुग्णालयाने  वरचे स्थान मिळवल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयाची माहिती देण्यात आली. यावेळी जि. प.सदस्या सौ.शितलदेवी मोहिते- पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील,गटविकास अधीकारी सुरेश मार्कड, तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते, डॉ.अविनाश घोरपडे, मुकुंद जामदार, डॉ.सुप्रिया खडतरे, डॉ.जयश्री घोरपडे, डॉ.प्रवीण शिंदे, डॉ.विक्रम गायकवाड आदी उपस्थित होते.
 

माता व बालमृत्यू प्रमाण कमी करण्याचे दृष्टीने भारत सरकारने हे अभियान सुरू केले असून त्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा मोफत पुरवल्या जात आहेत. राज्य,जिल्हा,व तालुका पातळीवर हे अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी ज्या ठिकाणी शासकीय अधिकारी व कर्मचारी कमी असतील अशा ठिकाणी खाजगी नेमणुुका करून हे अभियान राबविण्याचे आहे. अकलूज उपजिल्हा रुग्णालयात नियमित सेवेसाठीही जवळपास आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्ग कमी असून या अभियानाच्या धोरणानुसार तालुक्यातील इतर उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रातून येणार्‍या रुग्णांच्या तापासण्याही याच उपजिल्हा रुग्णालयातून करावयाच्या असल्याने नियमित सेवेत अडचणी येत आहेत.

या अभियानाच्या धोरणानुसार या उपजिल्हा रुग्णालयाने बाल रोग तज्ज्ञ डॉ.मुकुंद जामदार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.विक्रम गायकवाड तर भुलतज्ज्ञ डॉ.अतुल दोशी यांच्या नेमणुका करून या अभियानाच्या कामाला सुरुवात केली आहे. व आतापर्यंत नॉर्मल डिलिव्हरी व सीझर मिळून 127  रुग्णांना लाभ दिला आहे. जिल्ह्यात हे कामाचे प्रमाण सर्वाधिक आहे. शासनाने या उपजिल्हा रुग्णालयास आवश्यक तेवढे आरोग्य अधिकारी, कर्मचारी व औषधाचा पुरवठा केल्यास कामाचे प्रमाण आणखी वाढेल असा विश्‍वास यावेळी उपस्थितानी व्यक्‍त केला.