Sun, Dec 16, 2018 20:24होमपेज › Solapur › अकलूजची पूजा घोगरे मराठी चित्रपट रणांगणची मुख्य नायिका

अकलूजची पूजा घोगरे मराठी चित्रपट रणांगणची मुख्य नायिका

Published On: May 01 2018 1:18AM | Last Updated: Apr 30 2018 8:28PMअकलूज : तालुका प्रतिनिधी

खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांचे स्विय सहायक राजेंद्र घोगरे यांची कन्या पूजा घोगरे हिने छोट्या पडद्या वरून मोठ्या पडद्यावर आगमन केले आहे. तिचा बिगबजेट मराठी चित्रपट रणांगण 11 मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रणाली मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.तिच्या माध्यमातून अकलूजच्या मातीतील   अभिनेत्री   चित्रपट सृष्टीत नाव लौकिक करण्यास सज्ज झाली आहे.

अकलूजच्या सांस्कृतिक चळवळीने अनेक गुणी कलाकार चित्रपट सृष्टीला दिले आहेत.प्रणाली घोगरे हिनेही या पूर्वी राजश्री प्राडक्शनच्या ‘मेरे रंगमे रंगने वाली’ या हिंदी मालिकेतही प्रमुख भूमिका केली आहे. निखील अडवानींचा गुड्डू इंजिनीयर ही शार्ट फिल्म तर मंचुकुटीसी वेल्लालो या तेलगू चित्रपटातूनही साऊथ मध्ये काम केले आहे. 

आता ती रणांगण चित्रपटातून रसिकांच्या पसंतीस उतरण्यास सज्ज झाली आहे.  या मध्ये सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी सारखे मोठे कलाकार काम करीत असून या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग व निर्मात्या करिश्मा जैन आहेत. खा. विजयदादा व मोहिते-पाटील परिवाराने तीच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रणालीचे वडील राजेंद्र घोगरे यांनी सांगितले.