Sat, May 30, 2020 03:24होमपेज › Solapur › अकलूज लावणी महोत्सवात ‘तुमच्यासाठी काय पण’ची बाजी

'तुमच्यासाठी काय पण'ने मारली बाजी

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 08 2018 10:17AM

बुकमार्क करा
अकलूज : तालुका प्रतिनीधी 

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित केलेल्या 26 व्या राज्यस्तरीय लावणीनृत्य  स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या व्यवसायिक गटात’ तुमच्यासाठी काय पण’, योगेश देशमुख पुणे या पार्टीने प्रथम क्रंमाक मिळवला. त्यांना रु. 25 हजार व स्मृती चिन्ह   तर लावण्यस्मृर्ती माधुरी बडदे, मुंबई व कैरी ही पाडाची, महेंद्र बनसोडे, पुणे या पार्टीला विभागून दुसरा क्रमांक मिळाला. त्यांना प्रत्येकी रोख रु.20 हजार व स्मृती चिन्ह जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह  मोहिते-पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.

स्मृती भवन, शंकरनगर  येथे आयोजित  केलेल्या  26 व्या राज्यस्तरीय  लावणी नृत्य स्पर्धेच्या  व्यवसायिक गटाच्या बक्षिस समारंभास परीक्षक डॉ.शशिकांत चौधरी, प्रा. मधुकर गायकवाड, सौ. सुवर्णा निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.  वैयक्‍तिक बक्षीसकरिता     उत्कृष्ट आदाकारीसाठी अश्वर्या बडदे, रु.5  हजार,  मुजर्‍यासाठी कैरी मी पाडाची, रु, 3 हजार,ढोलकीपट्टू सुनिल चव्हाण, गायक राखी चवरे, पेटीवादक सुनिल गोडवे, तबलावादक राहुल जावळे यांना प्रत्येकी रु.1 हजार व स्मृतीचिन्ह असे वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. 

व्यावसायिक गटात नाद घुंगराचा, राणी राठोड अमरावती, मदनमस्त अप्सरा, शैलेश लोखंडे, पुणे. याही पार्ट्यांचा सहभाग होता.  तीन वर्ष प्रथम क्रमांकासह हॅटट्रीक करणार्‍या  राजश्री नगरकर,कालीका कलाकेंद्र सुपा, आशा रूपा,वैशाली परभणीकर नटरंग कला केंद्र मोडनिंब, रेश्मा वर्षा परितेकर जयअंबिका कलाकेंद्र सणसवाडी, नंदा प्रमीला संगीता लोदगेकर, नटरंग कलाकेंद्र मोडनिंब या पार्ट्यांनी सहकार  महर्षिंच्या जन्मशताब्दी  निमित्त त्यांना अभिवादन म्हणून जादा कार्यक्रम  केला. या कार्यक्रमास रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.