Mon, Jun 17, 2019 04:09होमपेज › Solapur › ६० लाखांच्या मालासह चार वाळूतस्कर जेरबंद

६० लाखांच्या मालासह चार वाळूतस्कर जेरबंद

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 10:19PMअकलूज : वार्ताहर 

 येथील नीरा नदीच्या पात्रातील वाळू चोरून नेताना अकलूज पोलिसांनी अचानक छापा टाकून  3 जेसीबी, स्कॉर्पिओ व 4 ट्रॅक्टर  असे सुमारे 60 लाखांची वाहने जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असली, तरी दोन जेसीबी पळवून लावण्यात आरोपी यशस्वी झाले आहेत. 

 पो.उ.नि. यमगर व पो.को.स्वरूप शिंदे, सागर सावंत व उदय ढोणे हे रात्री गस्त घालत असताना येथील अकलाई मंदिरामागे नीरा नदीच्या पात्रात वाळू बेकायदेशीरपणे चोरून नेली जात असल्याचे दिसून आले.पोलिसांचे पथक गेले होते; मात्र तोपर्यंत दोन जेसीबी पळवून लावण्यात आले होते.