Mon, Aug 19, 2019 18:30होमपेज › Solapur › अवकाळी नुकसानीचे पंचनामे होणार कधी?

अवकाळी नुकसानीचे पंचनामे होणार कधी?

Published On: Apr 29 2018 10:09PM | Last Updated: Apr 29 2018 9:09PMअक्‍कलकोट : वार्ताहर

अक्‍कलकोट शहर व तालुक्यात 9 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी वादळी पाऊस व  गारपीटीमुळे आंबा, केळी, द्राक्ष बागांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान होईन दोन आठवडे झाले तरी अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकर्‍यांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

मागील दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अक्‍कलकोट तालुक्यातही अनेक ठिकाणच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केले असले तरी अक्‍कलकोट तालुक्यातील पंचनामे अद्याप झाले नाहीत. शेतकर्‍यांच्या आंबा, केळी, द्राक्ष  फळबागासह  शेती पिकाचे नुकसान झाले. अक्‍कलकोट तालुक्यातील शेतकर्‍यांच्या द्राक्ष, केळी, आंबा या फळबागा नुकसानी संदर्भात महसूल व कृषी विभागाने पाहणी न केल्याने येथील शेतकरी नुकसानीपोटी मिळणार्‍या शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पंचनामे  करण्याबाबत कसूर केलेल्या महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी भरगप्पा कुंभार यांनी केली आहे.

दुजाभाव का?

जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले असले तरी अक्‍कलकोट तालुक्यातील पंचनामे झाले नसल्याने ही दुजाभावाची वागणूक का दिली जात आहे, असा सवाल व्यक्‍त होत आहे.