Thu, Apr 25, 2019 05:56होमपेज › Solapur › रविवारपासून कृषी महोत्सव

रविवारपासून कृषी महोत्सव

Published On: Mar 06 2018 12:09AM | Last Updated: Mar 05 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

येत्या 11 ते 16 मार्चदरम्यान सोलापुरातील होम मैदानावर जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरविण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाबरोबरच शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, शेतकर्‍यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने हा महोत्सव सोलापुरात पार पडणार आहे. यावेळी विविध प्रकारचे 200 स्टॉल याठिकाणी लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रगतशील शेतकर्‍यांच्या मुलाखती, कृषी तज्ज्ञांची थेट भेट, जागतिक नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख, पीक स्पर्धा,  नवीन संशोधन, कृषी उत्पादकता, गटशेती, शेतीपूरक उद्योग, कृषी क्षेत्रातील संधी, परिसंवाद, शासनाच्या योजनांची माहिती, पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. 

यासाठी किमान दहा हजार शेतकर्‍यांची उपस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी इव्हेंट कंपन्यांनाही बोलावण्यात आले असून त्यासंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली आहे. 11 ते 16 मार्चदरम्यान पाच दिवस चालणार्‍या या कृषी महोत्सवात शेतकर्‍यांना नवनव्या गोष्टींची ओळख करून देण्यात येणार आहे.