Sun, Nov 18, 2018 09:57



होमपेज › Solapur › पत्नीच्या निधनानंतर पतीनेही त्यागले प्राण!

पत्नीच्या निधनानंतर पतीनेही त्यागले प्राण!

Published On: Sep 13 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 11:13PM



बेंबळे : प्रतिनिधी

वयोवृद्ध पतीच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मानसिक धक्‍का बसलेल्या वृद्धेचे सोमवारी दुपारी निधन झाले. वृद्ध पतीवर वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना हा मानसिक धक्‍का बसला होता. तर, पत्नीच्या निधनानंतर वयोवृद्ध पतीनेही अवघ्या बारा तासांत प्राण त्यागले. पती-पत्नीच्या निधनामुळे बेंबळे, घोटीसह परिसरात एकच हळहळ व्यक्‍त होत आहे. लीलावती भोसले (रा. घोटी) असे या वृद्धेचे नाव असून, एकनाथ भोसले असे त्यांच्या पतीचे नाव आहे. 

घोटी गावचे सरपंच नागेश भोसले यांचे वडील एकनाथ भोसले हे आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार करून घरी आणले, पण त्यांची तब्येत अधिकच खालावल्याचा मानसिक धक्‍का त्यांची पत्नी लिलावती यांना सहन झाला नाही. या धक्क्याने त्यांची प्राणज्योत सोमवारी दुपारी चार वाजता मालवली. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर 10 ते 12 तासांच्या आत एकनाथ भोसले यांचेदेखील मंगळवारी पहाटे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. दरम्यान, पती-पत्नीचे अशा तर्‍हेन 12 तासांत निधन झाल्याने बेंबळे, घोटी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. लिलावती भोसले यांना केवळ पती निधनाच्या अगोदर दहा-बारा तास का होईना सुहासिनीचे मरण आल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.