Mon, Apr 22, 2019 12:09होमपेज › Solapur › कोरेगाव घटनेनंतर सामाजिक सलोख्यासाठी तरुणांचे एक पाऊल

कोरेगाव घटनेनंतर सामाजिक सलोख्यासाठी तरुणांचे एक पाऊल

Published On: Feb 05 2018 7:27AM | Last Updated: Feb 05 2018 7:27AMसोलापूर : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथे झालेल्या प्रकारानंतर राज्यातील सामाजिक विण उसवल्याचे दिसत आहे. जाती जातीत भेदाच्या भिंती उभ्या राहिलाचे आपण पाहिले आहे. मात्र, लांबोटी गावातील शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची तर उपअध्यक्षपदी धनगर समाजातील तरूणाची निवड करून गावकऱ्यांनी एक वेगळाच संदेश दिला आहे. यामुळे लांबोटीतील शिवतेज शिवजन्मोत्सव तरूण मंडळाचे सगळीकडे कौतुक होत आहे. 

लांबोटी ( ता. मोहोळ जि. सोलापूर ) येथिल शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी शरद चंदनशिवे यांची तर उपाध्यक्षपदी अमित पाटील यांची तर सचिव म्हणून सुनिल मिरजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  रविवारी लांबोटी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या राजदीप हाऊस येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या निवड करण्यात आली. 

या बैठकिला दादा फाऊंडेशनचे सचिव अमर जाधव, माजी उपसरपंच रामचंद्र चट्टे, विकास जाधव, भगवान गायकवाड, विश्वास चंदनशिवे, वसंत देवकर, आण्णा चंदनशिवे, शंकर चट्टे, गणेश चट्टे, दादा गरड, आनंद व्यवहारे, विष्णू चट्टे, विलास शिंदे यांच्यासह शिवतेज तरूण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थीत होते. 

या निवडीबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव म्हणाले, " छत्रपती शिवराय हे बहूजनांचे राजे होते. मात्र काही लोकांनी महाराजांना विशिष्ट जातीत बंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे शिवजन्मोत्सव हा सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत करण्यासाठी अध्यक्षपदी दलित समाजातील व्यक्तीची निवड करण्याची सुचना आमचे मार्गदर्शक व दादा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार ब्रह्मा चट्टे यांनी केली होती. त्यांच्या सुचनेनुसार आज एकमताने या निवडी करण्यात आल्या असून समाजात सामाजिक सलोखा टिकून रहावा म्हणून आम्ही सतत कार्यरत राहणार असल्याचे ग्वाही चंद्रकांत जाधव यांनी दिली.

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर बोलताना नुतन अध्यक्ष शरद चंदनशिवे म्हणाले, " शिवजन्मोत्सवाचे अध्यक्षपदाने मी भारावून गेलो आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल. शिवजन्मोत्सवाची सुरवात १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. करण्यात येणार असून 25 फेब्रुवारी रोजी सायांकाळी ४ वाजता भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात येणार आहे.

शिवजन्मोत्सव व मिरवणूक शांततेत शिस्तप्रिय एक आदर्श अशी पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहान नुतन अध्यक्ष शरद चंदनशिवे यांनी केले.