Thu, Sep 20, 2018 15:04होमपेज › Solapur › आदित्य ठाकरे यांचा कामगार सेनेच्या वतीने सत्कार

आदित्य ठाकरे यांचा कामगार सेनेच्या वतीने सत्कार

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 9:44PMसोलापूर : प्रतिनिधी

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कामगारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.

भारतीय कामगार सेना महासंघ प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने राज्यातील शेतमजूर व असंघटित कष्टकरी कामगारांच्या विविध समस्यांबाबत काढण्यात आलेल्या कामगार बचाव संघर्ष यात्रेचा संपूर्ण अहवाल आदित्य ठाकरे यांना सादर करुन याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे, अशी विनंती केली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे खजिनदार विठ्ठल कुर्‍हाडकर, शिवसेना विभाग प्रमुुख शिवा ढोकळे आदी उपस्थित होते.