Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Solapur › २७ लाखांचा पाणीपुरवठा कृती आराखडा

२७ लाखांचा पाणीपुरवठा कृती आराखडा

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 9:24PMअक्कलकोट : वार्ताहर  

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदा एप्रिल ते जून या कालावधीसाठी 43 गावांकरिता विहीर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करणेकामी तब्बल 27 लाख 39 हजार रुपयांचे पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. उर्वरित विविध कामांसाठी 14 व्या वित्त आयोगाचे निधी खर्ची करावयाचे असल्याने त्याचा आराखडा तयार करण्यात आलेले नाही. एकूणच गतवर्षाच्या तुलनेत यंदा तालुक्यात कमी गावांमध्ये पाणीटंचाई भासत असल्याचे आकडेवारीच्या आराखड्यावरून दिसून येत आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई भासणार्‍या संभाव्य गावांचे टंचाई कृती आराखडा नुकताच तयार करण्यात आला आहे. यामध्ये गावनिहाय खर्चाचे रक्‍कम असे : शावळ, शावळ तांडा, चिंचोळी (न), भोसगे तांडा, हंजगी, नाविंदगी, नाविंदगी तांडा, दुधनी ग्रामीण भीमनगर, दुधनी ग्रामीण सोळसे तांडा, म्हेत्रे तांडा, डोंबरजवळगे, कडबगाव-काशिलिंग तांडा, कडबगाव-स्टेशन, दहिटणे, बादोले बु॥, करजगी, समर्थनगर, किणी, साफळे, किरनळ्ळी, मंगरुळ, हसापूर, शिरसी, कोळीबेट, बादोले खु॥, आळगे, अंकलगे, तडवळ, खानापूर, देविकवठे, हिळ्ळी, कुडल, आंदेवाडी बु॥, आंदेवाडी बु-कुंभार वस्ती, कुमठे, कोर्सेगाव, कल्लकर्जाळ, शिरसी तांडा, संगोगी (आ), हंद्राळ, कर्जाळ, किणीवाडी, सुलतानपूर, सांगवी बु, बोरगाव, बणजगोळ, सुलेरजवळगे, वागदरी, बबलाद-परमानंदनगर या वरील 41 गावांना प्रत्येकी 27 हजार रुपयेप्रमाणे, तर नागणसूर 1 लाख 35 हजार, जेऊर 54 हजार असे एकूण 43 गावांपैकी काही गावांना विहीर अधिग्रहण करणेकामी 15 लाख 39 हजार, तर काही गावांना गरज असल्यास टँकरने पाणीपुरवठा करणेकामी 12 लाख रुपये असे एकूण शासनाने यंदाच्या वर्षी 27 लाख 39 हजार रुपये इतका टंचाई आराखडा तयार केला आहे. 

उर्वरित गरज भासेल त्या गावात नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, विशेष दुुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पूरक नळ पाणीपुरवठा योजना राबविणे, बुडकी खोदणे, विहीर खोल व गाळ काढणे या कामांकरीता ज्या-त्या गावांमध्ये 14 व्या वित्त आयोगातून मुबलक निधी शिल्लक असून त्यामधून खर्च करावयाचे असल्याने वरील योजना टंचाई आराखडा समावेश करण्यात आले नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. एकूणच गतवर्षाच्या तुलनेत यंदा संभाव्य पाणी टंचाई भासणार्‍या गावांची संख्या फारच कमी आहे. 

पाच बोअरचे विनामोबदला अधिग्रहण

आजमितीस तालुक्यातील एकही गावचे टँकरसाठी व विहीर अधिग्रहण करणे आदी प्रकारचे पाणीटंचाईकामी संबंधित पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे एकाही गावचे प्रस्ताव दाखल झालेले नाहीत. तसेच एका नागणसूर गावामध्ये भूजल अधिनियम 2009 नुसार सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोतापासून 500 मीटर आत असलेल्या पाच बोअरचे विनामोबदला अधिग्रहण करुन ग्रामस्थांना पाण्याची सोय संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे.

 

Tags : solapur, Akkalkot, Akkalkot news, water supply, Action plan,