Mon, Apr 06, 2020 09:58



होमपेज › Solapur › सोलापूर : सांगवीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई

सोलापूर : सांगवीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई

Last Updated: Jan 24 2020 7:18PM

अवैध वाळू उपसा करणारी वाहने



करकंब : वार्ताहर

सोलापूर जिल्ह्यातील सांगवी (ता.पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. धाड टाकून तीन ट्रॅक्टर आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले. एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. शुक्रवारी २४ जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास करकंब पोलिसांनी ही कारवाई केली. 

वाचा :चंद्रभागा वाळवंटातील अतिक्रमण हटवले

याबाबत पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी फिर्याद दिली. एकूण नऊ जणांविरोधात करकंब पोलिसांत भादवि ३७९, ३९२, ३४१, ३५३, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगवी येथील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती वरून पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे सांगवी येथे रात्री एक वाजता पोहचले. तेथे तीन ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांना फोनवरून कल्पना दिली. तातडीने पाटील आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सांगवी येथे पोहचले.

वाचा :कुटुंबातील जमिनीची विभागणी झाली सोपी

तेव्हा एका ट्रॅक्टरचा चालक पळून गेला. तर अक्षय शिवाजी भोसले (वय २५, रा. सांगवी) व बंडू मारकड (वय ३६, रा. बादलकोट) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण त्यानंतर ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात घेऊन येत असताना सांगवी येथील सरपंच यांचा मुलगा बापू जालिंदर गलांडे व त्यांच्या पाच साथीदारांनी पोलिसांशी हुज्जत घालून ट्रॅक्टर चालकास खाली ढकलून दिले. एका ट्रॅक्टरमधील अवैध वाळू रस्त्यावरच टाकून अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टरसह पलायन केले. याशिवाय बापू श्रीमंत रोडगे यांच्या दादा या मुलानेही पोलिसांच्या ताब्यातील ट्रॅक्टर जबरदस्तीने घेऊन पलायन केले. पोलिसांनी रात्री जीवाची पर्वा न करता सुमारे ९ लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

वाचा :आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा

त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेची चोरी करणे, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, पोलिसांच्या ताब्यातील माल जबरदस्तीने हिसकावून घेणे, आदी कायद्यानुसार नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील करत आहेत.

वाचा :२०‘आयएएस’ अधिकार्‍यांचे पथक सोलापुरात