Sat, Apr 20, 2019 08:42होमपेज › Solapur › ‘एटीएस’चे छापासत्र

‘एटीएस’चे छापासत्र

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:09PMनातेपुते : सुनील गजाकस

नातेपुते येथे महाराष्ट्र दहशत विरोधी पथकाने सुधन्वा जोगळेकर यांच्या संपर्कातील नातेपुते येथील प्रसाद देशपांडे व अवधूत पैठणकर यांची कसून चौकशी केली.

सोलापूर, पुणे, सातारा, मुंबई, नालासोपारा याठिकाणी घातपात घडवण्याचा कट उधळण्यात महाराष्ट्र एटीएस पथकाला यश आले असून, या प्रकरणातील संशयित आरोपी सुधन्वा जोगळेकर याचे धागेदोरे शोधण्यासाठी एटीएस पथकाने त्याच्या मुक्‍कामाच्या ठिकाणी व कॉल रेकॉर्ड वरून संपर्कातील इसमांची पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.
सदर हकीकत अशी की, सोलापुरात घातपात घडवण्याच्या कटामध्ये सापडलेले संशयित आरोपी सुधन्वा गोंधळेकर हे दि.7 ऑगस्टच्या दरम्यान  नातेपुते या ठिकाणी सदर इसमाच्या घरी मुक्‍कामी होता. त्याचबरोबर त्यांच्या कॉल डिटेल्स माहितीवरून एटीएस पथकाने नातेपुते येथील प्रसाद देशपांडे, अवधूत पैठणकर त्यांच्या घरावर सकाळी 7 वा. धाड टाकली. यावेळी  तपासासाठी जोगळेकर यालाही नातेपुते येथे आणले होते. यांच्याशी या इसमाचा घातपात कट रचण्याच्या प्रकरणांमध्ये काही धागादोरा हाताशी लागतो का याबाबत चौकश करण्यात आली असून ठोस पुरावे व  माहिती हाताला न लागल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.