Tue, Sep 25, 2018 13:02होमपेज › Solapur › तिर्‍हे येथील अवैध वाळू उपशावर छापा

तिर्‍हे येथील अवैध वाळू उपशावर छापा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथील सीना नदीच्या पात्रातून चोरून होणार्‍या वाळू उपशावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी 5 वाहने आणि 15 ब्रास वाळूसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

तिर्‍हे येथील सीना नदीच्या पात्रातून चोरून वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रभू यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने याठिकाणी शुक्रवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी सीना नदीच्या पात्रातून जेसीबी क्र. एमएच 04 बी 5854 याच्या मदतीने हायवा टिप्पर क्र. एमएच 10 झेड 3468, एमएच 13 एएक्स 2775, दोन टॅ्रक्टर, 2 ट्रॉलीमध्ये वाळू भरण्यात येत होती. त्यावेळी पोलिस पथकाने या वाहनातून सुमारे 15 ब्र्रास वाळू जप्त केली असून सर्व वाहने जप्त केली आहेत. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे, पोलिस नाईक अमृत खेडकर, पोलिस शिपाई अनुप दळवी, अभिजित ठाणेकर, सागर ढोरे-पाटील, सुरेश लामजने, बालाजी नागरगोजे, अमोल जाधव, सचिन कांबळे, विलास पारधी, महादेव लोंढे यांच्या पथकाने केली.

Tags : Solapur, Solapur News,  special team,  Superintendent, Police, Friday, raided, sand stolen, river bed, raided,  midnight, Friday.


  •