Thu, Nov 14, 2019 06:06होमपेज › Solapur › आषाढी वारीनिमित्त शहरात विठ्ठल मंदिरात भक्ताची गर्दी

सोलापूर : विठ्ठल मंदिरात भक्ताची गर्दी

Published On: Jul 12 2019 7:03PM | Last Updated: Jul 12 2019 6:43PM
सोलापूर : प्रतिनीधी

पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी लाखो वारक-यांसह संतांच्या पालख्या पोहोचले असताना सोलापूर शहर व परिसरात आज (ता.१२) आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली. चौपाड येथी जुन्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. दत्त चौकातील शुभराय मठाच्यावतीने रथयात्रा काढण्यात आली. यावेळी विविध शाळांनी बालविद्यार्थ्यांच्या सहभागातून आषाठी दिंडया काढल्या. यात साक्षात विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताई अशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केले होते. 

सोलापुरातील प्रसिद्ध असलेले व भाविकांच्या इच्छापूर्ती करणारे चौपाड येथील विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भक्तांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आसरा सोसायटीतील रेल्वे रूळाशेजारील विठ्ठल मंदिरातही सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात सकाळपासून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

चौपाड विठ्ठल मंदिर, जुने विठ्ठल मंदिर, भडंगे गल्लीतील विठ्ठल मंदिर, पांजरापोळ चौकातील मातंग समाजाचे विठ्ठल मंदिर, बेगम पेठेतील स्वकुळ साळी समाजाचे विठ्ठल मंदिर, तुळजापूर वेशीतील काशी कपडे समाजाचे विठ्ठल मंदिर, फलटण गल्लीतील विठ्ठल मंदिर, शुक्रवार पेठेतील भावसार समाजाचे विठ्ठल मंदिर, गवळी वस्तीतील विठ्ठल मंदिर, कुंभार वेशीतील विठ्ठल मंदिर आदी अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती.