Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Solapur › इंद्रायणी पॅसेंजरला १५ दिवसांचा ब्रेक

इंद्रायणी पॅसेंजरला १५ दिवसांचा ब्रेक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

 माढा ते वडशिंगेदरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-मिरज एक्स्प्रेस व सोलापूर-पुणे पॅसेंजर एक्स्प्रेसला पंधरा दिवसांचे ग्रहण लागले आहे.सोलापूर मध्य रेल्वे विभागातील दौंड-सोलापूर सेक्शनदरम्यान दुहेरीकरणाचे कार्य 1 एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्र. 71415, 71416, 71413 सोलापूर-पुणे व पुणे-सोलापूरदरम्यान धावणारी पॅसेंजर 1 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्र. 12169, 12170 सोलापूर-पुणे व पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस 1 एप्रिल ते 15 एप्रिल रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-सोलापूर व सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-मिरज व मिरज ते सोलापूर या एक्स्प्रेस गाड्यादेखील 1 एप्रिलपासून 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गाडी क्र. 11017 लोकमान्य टिळक ते कन्याकुमारी स्थानकापर्यंत धावणारी एक्स्प्रेस फक्त 7 एप्रिलला रद्द करण्यात आली आहे, तर गाडी क्र. 11018 कन्याकुमारी ते लोकमान्य टिळक स्थानकादरम्यान धावणारी एक्स्प्रेस 9 एप्रिलला एका दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे.त्यासोबत अनेक एक्स्प्रेस गाड्या  शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत व वळवण्यात आल्या आहेत.

यापूर्वी जेऊर ते वाशिंबे या स्थानका दरम्यान रुळाखालील खडी बदलण्याच्या कामामुळे 1 नोव्हेंबर 2017 पासून 6 मार्चपर्यंत इंद्रायणी रद्द करण्यात आली होती.चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रुळावर आलेल्या इंद्रायणीला एक महिन्याच्या आत पुन्हा पंधरा दिवसांचे ब्रेक लागले आहे. यामुळे नागरिक रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.


  •