Sun, Apr 21, 2019 02:16होमपेज › Solapur › अंध राहूलने मिळवले 90 टक्के गुण

अंध राहूलने मिळवले 90 टक्के गुण

Published On: Jun 11 2018 1:09AM | Last Updated: Jun 10 2018 10:22PMपंढरपूर : प्रतिनिधी

भंडिशेगाव ( ता.पंढरपूर) येथील  वाघजाईवस्तीवरील अंध राहुल नवनाथ गाजरेने दहावीच्या परीक्षेमध्ये 90.20% गुण मिळवत यशाचा अनोखा झेंडा फडकाविला आहे.
शेतमजूरी करणार्‍या नवनाथ गाजरे आणि लता गाजरे यांची दोन्ही मुले अंध आहेत. त्यापैकी धाकट्या राहुलने नव्वद टक्के गुण मिळविल्याने तो सर्वांसाठी कौतुक व प्रेरणेचा स्त्रोत ठरला आहे. तो अहमदनगर येथील 108 श्री.म.पं.सच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालयात शिकत होता.तर त्याचे प्राथमिक शिक्षण शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळा पंढरपूर येथे झाले होते.

खोटे आरोप करुन वस्तीगृहातून  हाकलून दिलेल्या राहुलला आकाश सितापूरे, प्रज्योत महाले , शिरसट यांनी नुसती खोली करुन दिली नाही तर पुस्तके वाचून वाचून दाखवून अभ्यास करुन घेतला. प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. परीक्षेत मदतनीस पुजा ढाळे या आठवी इयत्तेच्या ताईने प्रोत्साहनही दिले.
मोठा भाऊ अंध असूनही बी.ए.आहे तर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. त्याने वेळोवेळी प्रेरणा दिली. अनेक एन.जी.ओं.नी अँडिओ कँसेट उपलब्ध करुन दिले.  तर गुगलच्याटाँट डँक साँफ्टवेअरचा, मेमरी कार्ड, यूट्यूबचा अभ्यासात फार उपयोग झाला. शाळेतील सर्व शिक्षकांनी पाठीशी राहून प्रचंड साथ व प्रेरणा दिली.

आनंद शब्दात व्यक्त न करु शकणार्‍या राहुलला आय.टी. मधून साँफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे. राहुलच्या या यशाने सुखावलेले, मात्र प्रचंड कष्ट करण्याची तयारी त्याच्यासाठी करणारे त्याचे शेतमजूर आई-वडिल वा अंध भाऊ आनंदले आहेत.