होमपेज › Solapur › ढवळसच्या चोरट्यांकडून  83 लाखांचा ऐवज जप्त

ढवळसच्या चोरट्यांकडून  83 लाखांचा ऐवज जप्त

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 8:46PM

बुकमार्क करा
कुर्डुवाडी : प्रतिनिधी 

बंगळूरु  येथे मुंबईच्या व्यापार्‍याचे साडेसहा किलो सोने असणारी बॅग लंपास करुन पळालेल्या आरोपीकडून 68 लाखांचे  2 किलो 367 ग्रॅम सोने व रोख 15 लाख रुपये असा एकूण 83 लाखांचा ऐवज शुक्रवार, 29 रोजी हस्तगत करण्यात आला. यातील मुख्य आरोपी व साथीदार माढा तालुक्यातील ढवळस येथील आहेत.पंडित मुड्या सुकळे व अर्जुन बापू जाधव अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी माहिती देताना सांगितले की, बंगळुरु   शहरामध्ये मुंबईतील व्यापार्‍याची साडेसहा किलो सोने असलेली बॅग चोरट्यांनी पळवल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. सीसीटीव्हीचे फुटेज चेक करताना बोलेरो गाडीत आरोपी आल्याचे निष्पन्न झाले. हे आरोपी माढा तालुक्यातील ढवळस येथील असल्याने व ढवळस हे गाव कुर्डुवाडी पोलिसांच्या हद्दीत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी या घटनेच्या तपासासाठी आलेल्या बंगळुरु  पोलिसांच्या पथकाला तपासकामी मदत करण्याचे आदेश कुर्डुवाडी पोलिसांना दिले होते.

त्यानुसार शुक्रवार, 29 रोजी कुर्डुवाडी पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे व पो.हे. रमेश मांदे यांनी ढवळस येथील पंडित मुड्या सुकळे व अर्जुन बापू जाधव यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 83 लाख रूपयांचा ऐवज हस्तगत करुन आरोपी व मुद्देमाल कर्नाटक पोलिस पथकाच्या स्वाधीन केला.