Mon, Aug 19, 2019 09:33होमपेज › Solapur › 8 जणांची माघार, तर 9 उमेदवार रिंगणात 

8 जणांची माघार, तर 9 उमेदवार रिंगणात 

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 10:55PMसोलापूर : प्रतिनिधी 

महापालिका प्रभाग क्र. 14 क च्या पोटनिवडणुकीतून एकूण 8 उमेदवारांनी माघार घेतली असून 9 जण रिंगणात आहेत. या बहुरंगी लढतीमुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 17 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी 8 जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये मुबीन अहमद मुनीर अहमद वड्डो, ज्ञानेश्‍वर अंजिखाने, अ. कादर अ. हमीद बागनगरी, नशीम बागवान,  महमंद हनीफ सातखेड, गंगाधर साठे, जरगीस मुल्ला, उपेंद्र दासरी यांचा समावेश आहे. आता 9 जण निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. पीरअहमद शेख, वसीम सालार, नलिनी कलबुर्गी, तौफिक हत्तुरे, सद्दाम शाब्दी, रणजितसिंग दवेवाले, कय्युम सिद्दीकी, बापू ढगे, म. गौस कुरेशी या 9 जणांमध्ये लढत होणार असल्याने ही निवडणूक बहुरंगी ठरणार आहे. यापैकी  9 जणांपैकी 6 उमेदवार  मुस्लिम समाजाचे आहेत. मुस्लिमबहुल असलेल्या या प्रभागाची मतदार संख्या सुमारे 30 हजार इतकी आहे. यापैकी सुमारे 17 हजार मतदार हे एकट्या मुस्लिम समाजाचे आहेत. 6 मुस्लिम उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने मुस्लिम मतांची मोठ्या प्रमाणात मतविभागणी होणार असल्याची चर्चा आहे. या मतविभागणीचा फायदा भाजप, शिवेसना, माकप घेऊ इच्छित आहे. या निवडणुकीसाठी लवकरच प्रचाराच्या सभाही होणार असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. 

आज चिन्हांचे वाटप
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यावर शनिवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 6 एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. 
 

Tags : solapur, municipal corporation, election