Wed, Apr 24, 2019 20:15होमपेज › Solapur › दुहेरीकरण कामासाठी 8 पॅसेंजर गाड्या 5 दिवस रद्द

दुहेरीकरण कामासाठी 8 पॅसेंजर गाड्या 5 दिवस रद्द

Published On: May 23 2018 11:35PM | Last Updated: May 23 2018 11:20PMसोलापूर : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर ते वाडी सेक्शन दरम्यानच्या अक्‍कलकोट रोड ते नागणसूर स्थानकादरम्यानच्या 5 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण व रुळ जोडण्याच्या (नॉन इंटरलॉकिंग) कामासाठी या मार्गावरून धावणार्‍या आठ पॅसेंजर गाड्या 25 ते 29 मेदरम्यान पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याशिवाय काही गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार असल्याने या गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत होणार आहे.

दुहेरीकरण व नॉन इंटरलॉकिंग कामाच्या कालावधीत हैदराबाद-विजापूर (गाडी क्र. 57130), विजापूर-बोलाराम (57129), सोलापूर-गुंटकल (गाडी क्र. 71301), वाडी-सोलापूर (गाडी क्र. 71306), सोलापूर-फलकनामा (गाडी क्र. 57659), रायचूर-विजापूर (गाडी क्र. 57134), विजापूर-रायचूर (गाडी क्र. 57133), गुलबर्गा-सोलापूर (गाडी क्र. 57628) या आठ पॅसेंजर गाड्या 25 ते 29 मे या पाच दिवसांच्या कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर एलटीटी-विशाखापट्टणम् (गाडी क्र. 18520) ही गाडी 26 व 27 मे रोजी दोन दिवस आपल्या मार्गाऐवजी सिकंदराबाद, विकाराबाद, लातूररोड, कुर्डुवाडी या परिवर्तीत केलेल्या स्थानकांमार्गे धावणार आहे. परतीच्या प्रवासात विशाखापट्टणम्-एलटीटी (गाडी क्र. 18519) ही गाडीवरील दोन दिवस कुर्डुवाडी, लातूररोड, विकाराबाद, सिकंदराबाद या स्थानकांमार्गे धावणार आहे.

भुवनेश्‍वर-मुंबई (गाडी क्र. 11020) ही एक्स्प्रेस गाडी 26 व 27 मे रोजी सिकंदराबाद, विकाराबाद, लातूररोड, कुर्डुवाडी स्थानकामार्गे धावणार आहे. हैदराबाद-मुंबई (गाडी क्र. 12702) व सिकंदराबाद-राजकोट (गाडी क्र. 17018) या गाड्या 26 मे रोजी सिकंदराबाद, विकाराबाद, लातूररोड, कुर्डुवाडी स्थानकांमार्गे धावणार आहेत. मुंबई-भुवनेश्‍वर (गाडी क्र. 11019) ही गाडी 27 मे रोजी कुर्डुवाडी, लातूररोड, विकाराबाद, सिकंदराबाद या स्थानकामार्गे धावणार आहे. मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस (गाडी क्र. 11301) व चेन्नई-मुंबई मेल (गाडी क्र. 11028) या दोन गाड्या 26 व 27 मे रोजी होटगी, गदग, बेल्‍लारी, गुंटकल या मार्गे धावणार आहेत.

सोलापूर-यशवंतपूर-सोलापूर (गाडी क्र. 22133/22134) ही एक्स्प्रेस गाडी 27 मे रोजी सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान धावणार नाही. त्याच दिवशी ही गाडी गुलबर्गा ते यशवंतपूर अशी धावणार आहे. 27 मे रोजी मुंबई-चेन्नई मेल (गाडी क्र. 11027) आणि उद्यान एक्स्प्रेस (गाडी क्र. 11302) या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने, त्रिवेंद्रम-मुंबई एक्स्प्रेस (गाडी क्र. 16332) ही गाडी एक तास उशिराने, तर पुणे-सिकंदराबाद (गाडी क्र. 12025) व शताब्दी एक्स्प्रेस या गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने धावणार आहेत. त्याचबरोबर चेन्नई मेल (गाडी क्र. 11027/11028) गाडीला गोंदियाला जाण्यासाठी जोडण्यात येणारा एक अतिरिक्त डबा 26 व 27 मे रोजी जोडण्यात येणार नाही. प्रवाशांनी रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.