Sun, Apr 21, 2019 14:13होमपेज › Solapur › आठ बारबालांसह 19 जण ताब्यात

आठ बारबालांसह 19 जण ताब्यात

Published On: Apr 21 2018 10:38PM | Last Updated: Apr 21 2018 10:28PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजी नगरजवळील हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा मारून 8 बारबालांसह 19 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी बारबालांवर उधळलेले 32 हजार रुपयेदेखील जप्त केलेले आहेत.

सोलापूर शहरातील अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये बिनदिक्कतपणे डान्स बार सुरू असल्याबाबत दै. ‘पुढारी’ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत सोलापूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील पुणे महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल जय मल्हार ऑर्केस्ट्रा बार आणि आता हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारवर छापा  टाकून अश्‍लील नृत्य करणार्‍या बारबालांसह अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. 

अनिल कलप्पा मेडीदार (वय 43, रा. वारद चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर), रोमा सपन पाल (34, रा. शिवाजीनगर, बाळे), चंद्रा निर्मल विश्‍वास (25, रा. खिद्दूरपूर, कोलकाता), बंटी बापी चटर्जी (24, रा. डमडम एअरपोर्टजवळ, कोलकाता), हेमलता अशोक कुमावत (25, रा. प्रतापनगर, राजस्थान), पूजा शिवकुमार पाल (23, रा. मेहली जंक्शन, कोलकाता), बासोना देवन दास (25, रा. बंडगा, कोलकाता), इंदिरा प्रफुलचंद मलबंगी (32, रा. न्यू टाऊन, कोलकाता), मीनाशाम अर्जुनदास देखणेजी (वय 33, रा. उल्हासनगर, मुंबई), अशोककुमार मोतीलाल सोनार (वय 55, रा. खगेंद्र चटर्जी रोड, कोलकत्ता), हेमंत सुधाकर भांबद्रेकर (वय 40, रा. उमा नगरी, सोलापूर), बिभीषण गुलाब लोंढे (वय 43, रा. वारद चाळ, सोलापूर), शिवशक्ती सन्मुखप्पा हिप्परगी (वय 22, रा. माळी गल्ली, चौपाड, सोलापूर), परमेश्‍वर शिवलिंगप्पा कोळी (वय 25, रा. चंद्रोदय नगर, कुंभारी, सोलापूर), बसवराज शिवलिंगप्पा कोळी (वय 32, रा. जुनी मिल चाळ, सोलापूर), मंजुनाथ सूर्यकांत नंदरगी (वय 28, रा. विनायक नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), शिवराज कुंडलिक ससाणे (वय 30, जुना देगाव नाका, आमराई, सोलापूर), मनोज मनबहादूर तीखात्री (वय 40, रा. गांधीनगर, हैदराबाद) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार हिंदुराव पोळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

ऑर्केस्ट्रा बारमध्ये नृत्य करण्यास बंदी असतानाही हॉटेल न्यू विनय ऑर्केस्ट्रा बारमधील बारबाला या तोकड्या कपड्यांवर नृत्य करून बिभित्स वर्तन करीत असून त्या बारबालांवर ग्राहक पैसे उधळत असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी स्वतः पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, हवालदार पोळ, अल्ताफ शेख, महिला हवालदार नाकेदार, पाडवी यांच्यासह  पोलिसांचा फौजफाटा घेऊन शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधून बारबालांवर उधळलेले सुमारे 32 हजार रुपये मिळून आले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक देशमाने तपास करीत आहेत.